Illegal Gas Cylinder : अवैध गॅस सिलिंडर वापराविरोधात मोहीम

पुरवठा विभाग अलर्ट मोडवर, अंबड व मंठा येथे धाडी
Illegal Gas Cylinder
Illegal Gas Cylinder : अवैध गॅस सिलिंडर वापराविरोधात मोहीमfile photo
Published on
Updated on

Campaign against illegal gas cylinder use

जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात व्यावसायीक वापराच्या गॅसची टंचाई निर्माण झालेली असतानाच मोठ्या प्रमाणावर व्यावसायीक घरगुती गॅसचा वापर व्यावसायीक वापरासाठी करत असल्याने घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे.

Illegal Gas Cylinder
Jalna News : थकबाकी भरा ; अन्यथा पाणी, वीजपुरवठा खंडित

या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाच्यावतीने अंबड व मंठा तालुक्यात घरगुती वापराच्या गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर छापे मारून घरगुती गॅस सिलिंडर पकडण्यात आले आहेत. अंबड येथे ९ तर मंठा येथे ७ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

इराण-अमेरिका युध्दानंतर जालना शहरासह जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई आल्याने गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. व्यावसायीक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने शहरातील अनेक हॉटेल बंद होण्याची वेळ आली आहे.

Illegal Gas Cylinder
Jalna Agriculture News : हार्वेस्टरने गहू काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी घरगुती गॅसचा वापर सुरू केल्याने घरगुती गॅसची टंचाई वाढली आहे. घरगुती गॅसचा व्यावसायासाठी होणाऱ्या अवैध वापरावर चाप बसविण्यासाठी पुरवठा विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे.

गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी मोहीम

प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मंठा शहरात घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि सुरक्षिततेचे नियम पाळले जावेत, यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news