Jalna Bandh : आज जालना जिल्हा बंदची हाक

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा
Manoj Jarange Patil hunger strike
Manoj Jarange Patil hunger strikepudhari photo
Published on
Updated on

Call for Jalna District Bandh today

जालना, पुढारी वृत्तसेवाः अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी गुरुवार (३) रोजी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil hunger strike
Ganeshotsav 2026 : विसर्जन कुंडाची महापौर-उपमहापौरांकडून पाहणी

आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे शनिवार (२९) रोजी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसले आहेत. बुधवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता. उपोषणा दरम्यान जरांगे यांची तब्येत बिघडल्याने मराठा समाजबांधव आक्रमक झाले आहेत. विविध ठिकाणी आंदोलन करून ते सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात जरांगे यांच्या आमरण उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बंद शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबधित ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागणार आहे. वडीगोद्री येथे बुधवारी अचानक रास्ता रोको करण्यात आल्याने काही काळ धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरू लागल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण तापू लागले आहे.

Manoj Jarange Patil hunger strike
साखरेच्या घाऊक साठवणुकीवर मर्यादा

जालना शहरात बंदच्या पार्श्वभूमीवर जालना अडतिया असोसिएशनच्यावतीने गुरुवारी सर्व व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. असोसिएशनच्यावतीने बाजार समितीच्या सचिवांना तसे पत्र देण्यात आले आहे. अडतिया असोसिएशनच्या बंदमुळे मोंढ्यातील सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने गुरुवारी शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये असे अवाहन करण्यात आले आहे.

जरांगे यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याची भावना मराठा समाज बांधवातून व्यक्त होत आहे. अंतरवालीत उपोषण सुरू झाल्यापासून सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्याबाबत तातडीने तोडगा न काढल्याने रोष वाढत आहे.

पोलिस यंत्रणा तत्पर

जालना शहरात बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात बंददरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा तत्पर राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news