Jalna Agriculture News : भाव नसल्याने कोबी फेकली रस्त्याच्या कडेला

भाजपीला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, कोबी घेण्यास नकार
Jalna Agriculture News
Jalna Agriculture News : भाव नसल्याने कोबी फेकली रस्त्याच्या कडेलाfile photo
Published on
Updated on

Cabbages dumped by the roadside due to lack of market price

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडी बाजारात शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली फुलकोबी व्यापाऱ्यांनी नाकारल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बाजारात मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी फुलकोबी घेण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांना ती रस्त्याच्या कडेला फेकून दिली आहे.

Jalna Agriculture News
Pune Grocery Market Prices: श्रावणपूर्वी किराणा बाजारात साखरेला गोडी; भावात पुन्हा वाढ, शेंगदाणे मात्र स्वस्त

पिंपळगाव रेणुकाईसह परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकरी दररोज सकाळी भाजीपाला घेऊन बाजारात येतात. यावेळीही अनेक शेतकऱ्यांनी फुलकोबीची मोठ्या प्रमाणात आवक केली होती. परंतु व्यापाऱ्यांनी "भाव पडला आहे" आणि "माल निघत नाही" असे सांगून खरेदी करण्यास नकार दिला.

पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरलेली फुलकोबी रस्त्याच्या कडेला ओसाड जागेवर टाकली अनेक पोती फुलकोबी अर्धवट खराब अवस्थेत पडून आहेत. एकीकडे उत्पादन खर्च वाढला आहे आणि दुसरीकडे योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. "खत, बी-बियाणे, मजुरीचा खर्च निघत नाही. व्यापारी मनमानी करतात. यामुळे भाजीपाला, भुसार मालाला हमीभाव देण्यात यावा. शासनाने याकडे लक्ष द्यावे" अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Jalna Agriculture News
सेवानिवृत्त शिक्षिकेचे लाभ रोखले; जालना महापालिका आयुक्तांना 'हायकोर्टा'ची नोटीस

हमीभाव द्यावा

गेल्या काही दिवसांपासून बाजारात तेल, शेंगदाणे, साखर, चना डाळ यासह सर्वच जीवनवश्यक वस्तूंच्या भावात वाढ झाली आहे. भाजपीला व शेतमालाच्या भावात वाढत होत नाही. शासनाकडून शेतकऱ्याविरोधा दुजाभाव होत आहे. शासनाने भाजीपाला व शेतमालास हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news