Jalna Crime News : भोकरदनमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास

चोरट्यांचे पोलिसांना आव्हान, सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा तपास सुरू
jalna news
भोकरदनमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; तीन लाख रुपयांचा ऐवज लंपासfile photo
Published on
Updated on

Broad-daylight burglary in Bhokardan; valuables worth three lakh rupees stolen

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन शहर आणि कुकडी (ता. भोकरदन) येथे बुधवारी दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडीच्या घटनांनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हात साफ करत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे दोन ते तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे चोरट्यांनी पोलिसांपुढे आवाहन निर्माण केले आहे.

jalna news
Chhatrapati Sambhajinagar Robbery : उंडणगाव येथे भरदिवसा शेतवस्तीवर धाडसी दरोडा

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापनगर येथील रहिवासी व शिक्षक सचिन देशमुख यांच्या घराचे बुधवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोख २५ हजार रुपये आणि नऊ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यांच्या सुदैवाने घरात दुसऱ्या ठिकाणी असलेले सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांच्या हाती लागले नाही.

याच दरम्यान, म्हाडा कॉलनी येथील राऊत यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र काही कारणास्तव चोरटे तेथून पळून गेल्याने मोठी चोरी टळली. दुसरीकडे, कुकडी येथील रहिवासी अनिल लव्हाळे यांच्या घरातून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. एकाच दिवशी घडलेल्या या लागोपाठच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

jalna news
Jalna Crime : पाहेगावात घरफोडी; ३ लाख ४९ हजारांचे दागिने, रोकड लंपास

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news