

जालना : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरीची घटना उघडकीस आली आहे. संशयित चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
या संदर्भात शेख मुस्तकीम मुसा कुरेशी (वय 30, रा. मदिना चौक, जुना जालना) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांची मोटारसायकल (क्र. एमएच 21, बीई 5378) ही 13 मे रोजी सायंकाळी 7.15 ते 7.35 वाजण्याच्या दरम्यान चोरीस गेली.
फिर्यादी हे आपल्या वडिलांना बसमध्ये बसविण्यासाठी जालना बसस्थानक परिसरात आले होते. त्यांनी मोटारसायकल बसस्टँड परिसरात उभी करून काही वेळासाठी तेथून गेले असता, परत आल्यानंतर गाडी जागेवर दिसून आली नाही. दरम्यान, सदर बाजार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.