चोरी करून पचणार नाही ! भुसावळ पोलिसांचा 'दोन' दिवसात तडाखा; ५.७० लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश

बाजारपेठ डी.बी. पथकाची धडाकेबाज कामगिरी; मुख्य आरोपीसह विधीसंघर्ष बालक ताब्यात, पावणे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Theft
Theft Pudhari
Published on
Updated on

जळगाव : शहरातील फातेमा कॉलनी परिसरात घर बंद असल्याचे पाहून डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. ५ लाख ७० हजार रुपयांच्या घरफोडीतील तब्बल ४ लाख ९९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी गुन्हेगारांना 'खाकी'चा इंगा दाखवला आहे.

फातेमा कॉलनीतील रहिवासी वसीम अहमद अब्दुल बासीद शेख हे २८ ते ३० मार्च दरम्यान आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील ५ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. ३० मार्च रोजी घरी परतल्यावर चोरी झाल्याचे लक्षात येताच वसीम शेख यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने न्यु ईदगाह जवळील अमीर खान हबीब खान (वय ३५) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली.

अमीर खानकडून पोलिसांनी गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मालापैकी ४ लाख ९९ हजार १०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड हस्तगत केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे आहे 'डॅशिंग' पोलीस पथक

जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय राजू सांगळे, विजय नेरकर, कांतीलाल केदारे, योगेश माळी, भूषण चौधरी, अमर अढाडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपूरकर, अक्षय कोतकर, प्रशांत सोनार, जीवन कापडे, जावेद शहा, सचिन चौधरी, महेंद्र पाटील आणि हर्षल महाजन यांनी ही चमकदार कामगिरी केली. पुढील तपास पीएसआय राजू सांगळे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news