Jalna News : भिवपूर गावातील अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार

महिलांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा; दारू विक्री कायमस्वरूपी बंद करा
Women Protest Against Liquor
भोकरदन: दारूबंदी करण्यासाठी पोलिस प्रशासनाला निवेदन देताना भिवपूर येथील महिला. pudhari photo
Published on: 
Updated on: 

भोकरदन : तालुक्यातील भिवपूर गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीविरोधात गावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेत एकजूट दाखवली आहे. गावातील सुमारे ३० ते ४० महिला एकत्र येत रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. गावातील अवैध देशी दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधित विक्रेत्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी महिलांनी या निवेदनातून केली आहे.

भिवपूर गावात मागील अनेक दिवसांपासून काही व्यक्तींकडून बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री सुरू असल्याचे महिलांनी निवेदनात नमूद केले आहे. या अवैध दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असून गावात वारंवार भांडणे, वादविवाद आणि कौटुंबिक कलह होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

Women Protest Against Liquor
Beed Water Crisis : तब्‍बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आष्टीचा पाणीपुरवठा सुरळीत

दारूच्या व्यसनामुळे सहा महिन्यापूर्वी गावातील योगेश भगवान जाधव हा तरुण मृत्यू पडला आहे. तसेच अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून महिलांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. घरातील लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनाही याचा त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विशेषतः गावातील तरुणांसह अल्पवयीन मुलेदेखील दारूच्या व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याबद्दल महिलांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सदर निवेदन सखुबाई आजिनाथ जाधव, लताबाई भगवान जाधव यांच्या नेतृत्वाखाली समस्त महिला नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.

Women Protest Against Liquor
Prakash Abitkar : रुग्णसेवेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाही !

अनेक वेळा समज

यापूर्वीही अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी संबंधितांना अनेक वेळा समज देण्यात आली. मात्र, त्यानंतरही अवैध दारू विक्री सुरूच असल्याने अखेर गावातील महिलांनी एकत्र येत पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.