Beed Water Crisis : तब्‍बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आष्टीचा पाणीपुरवठा सुरळीत

दुष्काळात जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे आष्टीकरांना मोठा दिलासा
Beed Water Crisis
Beed Water Crisispudhari photo
Published on: 
Updated on: 

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी गावातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येतून आता दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती झाल्यामुळे गावातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. दुष्काळ परिस्थितीत गावाचा पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

आष्टी हे परतूर तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असून, गावाची लोकसंख्या सुमारे ३० हजारांपेक्षा अधिक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जलवाहिनीच्या समस्येमुळे गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. महामार्गाच्या कामात मुख्य जलवाहिनी फुटली अन् पाणीपुरवठा विस्कळीत यापूर्वी आष्टी गावाला श्रिष्टी येथील पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, काही वर्षांपूर्वी शेगाव ते पंढरपूर या राज्य महामार्गाचे काम सुरू असताना मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

Beed Water Crisis
Chhatrapati Sambhajinagar News : अनधिकृत नळजोडणी कारवाईदरम्यान नागरिकांत राडा : दगडफेक, हाणामारी

गावाचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. बबनराव लोणीकर यांनी विशेष पुढाकार घेत गावाचा समावेश वॉटर ग्रीड योजनेत केला. त्यानुसार दुधना प्रकल्पातून आष्टी गावाला पाणी आणण्यासाठी जलवाहिनीची व्यवस्था करण्यात आली.मात्र, गावांतर्गत असलेली जुनी पाइपलाइन जीर्ण झाल्याने आणि तिची दुरवस्था झाल्याने पाणी गावातील सर्व भागांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी निर्माण होत होत्या. परिणामी, पाणी उपलब्ध असूनही गावातील अनेक वॉर्डांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते.

ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली आहे. या दुरुस्तीनंतर आष्टी गावात पुन्हा पाणीपुरवठा सुरू झाला असून, नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गावाचा विस्तार मोठा असल्याने अद्याप काही वॉर्डांतील अंतर्गत गल्लीबोळांमध्ये पाणी पोहोचलेले नाही.

Beed Water Crisis
Mumbai Data Centre Projects: मुंबई बनली देशाची डेटा सेंटर्सची राजधानी

मात्र, येत्या आठवडाभरात सहाही वॉर्डांतील सर्व भागांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले असल्याची माहिती सरपंच मधुकर मोरे, उपसरपंच नसरुल्लाखान काकड आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी दिली आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली आहे. आठवडाभरात गावातील सहाही वॉर्डांतील प्रत्येक गल्लीबोळांत नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.

डी.बी. काळे, ग्रामविकास अधिकारी, आष्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.