

Babasaheb Somde murder; All accused arrested
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरात अंबड रोडवरील जांगडे पेट्रोल पंपासमोर अहंकार देऊळगाव येथील माजी सरपंच बाबासाहेब सोमधने यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने तलवारीने हल्ला करून गुरुवारी सायंकाळी निघृण खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी कदिम जालना पोलिसांनी चार आर-ोपींना अटक केली असून आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.
जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेल्या जांगडे पेट्रोलपंपाजवळ भरदिवसा अहंकार देऊळगाव येथील माजी सरपंच बाबासाहेव सोमधाने यांच्या खुनाच्या घटनेनंतर संपूर्ण जालना शहरात खळबळ उडाली होती, हल्-लेखोरांनी घटनास्थळी टाटा सुमो या चारचाकी वाहनातून येऊन खुनाच्या घटनेनंतर ते वाहन तेथेच सोडून देत रिक्षातून पळ काढला होता.
कदिम जालना पोलिसांनी आरोपी मनोहर ऊर्फ बळीराम मच्छिंद्र सोमधने, सचिन मारुती गायकवाड, मच्छिंद्र साहेबराव सोमधने या तीन जणांना गुरुवारी उशीरा ताब्यात घेतले होते. तर चौथा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला होता.
फरार झालेल्या चौथा आरोपी अर्जुन मच्छिंद्र सोमधने यास अहंकार देवळगाव शिवारातील समृद्धी महामार्गाजवळ ताब्यात घेण्यात आले. कदिम जालना पोलिसांनी चारही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास कदिम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे ही करीत आहेत.