

ATS and Ambad police raided a cannabis farm in Kauchalwadi Shivar in Ambad taluka
जालना, पुढारी वृत्तसेवा अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारातील गांजाच्या शेतीवर एटीएस व अंबड पोलिसांनी छापा टाकून ८७ लाख रुपयाचा गांजा जप्त केला असून या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगेवाड व अंबड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, अंबड तालुक्यातील कौचलवाडी या गावात एका व्यक्तीने गांजाची शेती केली असून सध्या गांजाची काढणी सुरू आहे.
अंबडचे सपोनि सचिन इंगेवाड, पोलिस उपनिरीक्षक भगवान नरोडे, सहायक फौजदार शेख अकतर, पोलिस हवालदार विनोद गडदे, मारुती शिवरकर, कैलास कुरेवाड, यशवंत मुंढे, राधाकृष्ण हरकळ, दीपक बडूरे यांनी मिळालेल्या माहितीनुसार कौचलवाडी येथील शेत गट क्रमांक ७८७ शिवारातून जवळपास ४ क्विंटल गांजाची झाडे पाला, फुले काढणी काढणी करून ती सुकविण्यात येत आहेत.
तसेच काही झाडे उभी आहेत-पोलिसांनी शेतात जाऊन मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ, पोनि. संतोष घोडके, सपोनि. सचिन इंगेवाड, पोउनि. भगवान नरोडे, मारुती शिवरकर, कैलास कुरेवाड, यशवंत मुंढे, राधाकृष्ण हरकळ, दीपक बडूरे आदींनी केली आहे.