

Illegal mining of muruma in Dodadgaon Shivara, Ambad taluka
शहागड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील दोदडगाव शिवारात मुरुमाचे अवैध उत्खनन करणारा जेसीबी मशीन महसूलच्या पथकाने ताब्यात घेतला.
महसूलचे पथक कारवाईसाठी येत असल्याचे कळताच जेसीबी चालकाने जेसीबी मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करत जेसीबी ताब्यात घेण्यात आला. हा जेसीबी तहसील कार्यालय अंबड येथे लावण्यात आ-लेला असून हि कारवाई उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सुखापुरी विष्णू जायभाये, मंडळ अधिकारी वडीगोद्री संदीप नरुटे, ग्राम महसूल अधिकारी विशाल अनारूपे, योगेश गुरव, पवन तुपकर, श्याम विभुते महसूल सेवक मनीष जिरेकर, पोलीस कर्मचारी अब्दुल वाहब शेख, यांच्या पथकाने केली.