

Jalna Zilla Parishad and Panchayat Samiti Elections
आन्वा, पुढारी वृत्तसेवा: न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक ३१ जानेव-ारीपर्यत घेण्याचे निर्देश दिल्याने राजकीय वातावरण तापाले सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात प्रमुख पक्षांनी आपआपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकी घेण्यास तयार असून आतापासूनच ग्रामीण भागात राजकीय धुरळा उडत आहे.
कार्यकर्त्यांना निवडून आणण्यात प्रमुख पक्षांच्या नेत्यांचा मात्र चांगलाच कस लागणार असल्याने महायुती व महाआघाडी होण्याबाबत कार्यकर्तेही साशंक आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणक प्रक्रियेला गती दिल्याने प्रमख पक्षांकडून राजकीय हालचालीदेखील वाढल्या आहेत. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुक तयारीला लागले आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली नेत्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकते झटले होते. इच्छुक कार्यकर्त्यांना आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी प्रमुख नेत्यांचा कस लागणार आहे.