Jalna Crime News : संजय नगर येथे नालीच्या वादातून घरात घुसून मारहाण; महिला जखमी

कदीम जालना पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसल्याने एसर्पीकडे लेखी तक्रार
Jalna Crime News
Jalna Crime News : संजय नगर येथे नालीच्या वादातून घरात घुसून मारहाण; महिला जखमीFile Photo
Published on
Updated on

Assault Inside Home Over Drainage Dispute in Sanjay Nagar; Woman Injured

जालना, पुढारी वृत्तसेवा : जुना जालना परिसरातील संजय नगर येथे नालीच्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. "तू बंद नाली का उघडली?" असा जाब विचारत काही जणांनी घरात घुसून कोयता व काठ्यांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Jalna Crime News
Waluj theft case : महिलेच्या धाडसाने मंगळसूत्र चोरटा अटकेत

या हल्ल्यात एका महिलेच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोरांचा हातात कोयता घेतलेला थरारक व्हिडिओ समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी शेख सलीम शेख मोईद्दीन (रा. संजय नगर, जुना जालना) यांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देत संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. २१ मे रोजी आरोपी पुन्हा संतप्त अवस्थेत सलीम यांच्या घरासमोर आले.

Jalna Crime News
Jalna Crime News : कैलास पवार खून प्रकरण : दोन महिला आरोपी जेरबंद

यावेळी समीरखान जफरखान याने कोयत्याने सलीम यांच्या बहिणीच्या कपाळावर वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमी महिलेला तातडीने जालना येथील निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात सलीमखान जफरखान, शेख रईस शेख इब्राहीम, रफीक शेख इब्राहीम, अकबर शेख इब्राहीम आणि शेख अतिक शेख जावेद (सर्व रा. संजय नगर, जालना) यांची नावे तक्रारीत नमूद करण्यात आली आहेत. कदीम जालना पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला नसल्याचा गंभीर आरोपही तक्रारदाराने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news