Waluj theft case : महिलेच्या धाडसाने मंगळसूत्र चोरटा अटकेत

वडगाव कोल्हाटी येथील घटना; गुन्हा दाखल
 Theft Case
Theft CasePudhari
Published on
Updated on

वाळूज महानगर : महिलेने धाडस दाखवून मंगळसूत्र हिसकावणाऱ्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दुचाकीवरून पसार होण्याच्या तयारीत असताना महिलेच्या पतीने पाठलाग करून त्यास नागरिकांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना रविवारी (दि.१०) रात्री वडगाव कोल्हाटी येथे घडली. फेरोज ईकबाल शेख (३२ रा. आंबा, परतूर ह.मु. नूरानी मशीद जवळ, पवननगर, रांजणगाव) असे मंगळसूत्र चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

या विषयी अधिक महिती अशी की, शुभांगीनी इसळ (४० रा. मयूर पार्क, छत्रपती संभाजीनगर) व त्यांचे पती श्रीकांत इसळ हे रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बजाजनगरात जेवण करून पायी नातेवाईकाच्या घराकडे जात होते. यावेळी वडगाव कोल्हाटी येथील अक्षय तृतीय कॉर्नर जवळ विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या भामट्याने शुभांगीनी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला केला.

 Theft Case
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

यावेळी शुभांगीनी यांनी मदतीसाठी आरडाओरड करत चोरट्याचा शर्ट पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी शुभांगीनी यांच्या पतीने पाठलाग करून काही अंतरावर चोरट्यास पकडले. यावेळी येथे जमा झालेल्या लोकांनी सदरील चोरट्यास चांगलाच चोप दिला.

 Theft Case
Chatrapati Sambhajinagar Crime: मोबाईल, पैशाच्या संशयातून मित्रांनीच केला गेम; जटवाडा डोंगरावर नेऊन चिरला गळा

दरम्यान एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यास ताब्यात घेत त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव शेख फेरोज असे असल्याचे सांगितले. या प्रकरणी शुभांगीनी इसळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्यात आरोपी शेख फेरोज याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news