Jalna Sugarcane Fire : पंचवीस एकरवरील ऊस जळून खाक

अंतरवाली सराटी येथील घटना, नुकसान भरपाई देण्याची मागणी
Jalna Sugarcane Fire
वडीगोद्री : अंतरवाली सराटी शिवारातील उसाला लागलेली आग.pudhari photo
Published on: 
Updated on: 

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी शिवारात उसाला आग लागल्याने २५ एकरवरील ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकर्यांचे जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. आगीचे कारण अद्याप समजले नाही.

अंतरवाली सराटीमध्ये पाणी उपलब्ध असल्यामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात जास्त आहे. तोडणीस आलेला ऊस जळाल्याने शेतकऱ्यावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी काकासाहेब तारख, संदीप अदलिंगे, प्रल्हाद तारख, सुरेश वाघ, उद्धव वाघ, एकनाथ रंधे, नरेंद्र गाढवे इत्यादी शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे.

Jalna Sugarcane Fire
Marathwada Drought : ३३.५६ लाख शेतकऱ्यांना दिवाळी अग्रिमचा लाभ !

आगीचे कारण अद्यापही समजले नाही. आग विझविण्यासाठी समर्थ साखर कारखान्याचे अग्निशमन व अंबड नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Jalna Sugarcane Fire
Nanded Crime : नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्‍हे शाखेची कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.