Marathwada Drought : ३३.५६ लाख शेतकऱ्यांना दिवाळी अग्रिमचा लाभ !

मराठवाड्यात १६७८ कोटी रुपयांचे वाटप, बीडमध्ये सर्वाधिक ६ लाख लाभाथी
Money
MoneyPudhari
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात कमी पावसामुळे अतिशय बिकट स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे खरीप पीक पूर्णतः हातून गेले आहे. त्यामुळे विभागात दुष्काळ जाहीर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंचनामे करून मदतीची तयारी दर्शविली.

अद्याप एनडीआरएफनुसार मदत जाहीर झाली नसली तरी दिवाळी गोड व्हावी, यासाठी ५ हजार रुपये दिवाळी अग्रिम वितरित करण्यात येत आहे. त्यानुसार मराठवाड्यातील ३३ लाख ५६ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १६७८ कोटी २७ लाख ८५ हजार रुपयांचे वितरित करण्यात आले आहेत.

Money
Rohit Pathare Case : वैजापुरातील गँगवॉरचा तपास वेगात; सतरा जण पोलिसांच्या ताब्यात

यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पावसाच्या तुटीमुळे मराठवाड्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले. खरीप हंगामातील नुकसान आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार विभागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी पाहता, बीड जिल्हा मदत वितरणात आघाडीवर असून येथील ६,१२,०९३ शेतकऱ्यांना ३०६.०५ कोर्ट रुपयांचे अग्रिम वाटप करण्यात आले.

Money
Sambhajinagar MIDC Fire : टूलरूमच्या दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.