Nanded Crime : नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्‍हे शाखेची कारवाई

१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Nanded Crime
Nanded Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कंधार तालुक्यातील मौजे मानसपूरी शेतशिवाारात सुरू असलेल्या बेकायदेशीर 'तिर्रट' जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण ४ लाख ३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिग्दर्शक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ७ नोव्हेंबर २०२६ रोजी ही धडक कारवाई केली. कंधार ते उस्माननगर रोडवरील मोकळ्या जागेत जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून घटनास्थळावरून रोकड, जुगाराचे साहित्य, सात मोबाईल फोन आणि दोन मोटारसायकल असा ऐवज जप्त केला.

Nanded Crime
Chikhali Suspicious Death: चिखलीत २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ दगड आढळल्याने खुनाचा संशय

याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, काही आरोपींचा शोध सुरू आहे. अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Nanded Crime
Nanded Crime : वाढदिवसाच्या दिवशीच पतीने केला पत्नीचा खुनाचा प्रयत्न

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.