Jalna News : जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार वीज ग्राहकांना थकबाकी मुक्तीची संधी !

संपूर्ण व्याज व विलंब आकार होणार शंभर टक्के माफ
Jalna News
Jalna News : जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार वीज ग्राहकांना थकबाकी मुक्तीची संधी !file photo
Published on: 
Updated on: 

An opportunity for 1.73 lakh electricity consumers in the district to get relief from outstanding dues!

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना मंडळातील १ लाख ७३ हजार १९८ ग्राहकांकडे २७९ कोटी १२ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना ९२ कोटी १४ लाख रुपये व्याज व विलंब आकार माफ होणार आहे.

Jalna News
Jalna News : शंभर विद्यार्थिनींच्या क्षमतेचे तीन मजली वसतिगृह सज्ज; चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण

महावितरणने कायमस्वरूपी तसेच तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्चदाब व लघुदाब ग्राहकांसाठी 'अभय योजना २०२६-२७' जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ३ लाख ६५ का हजार १५७ थकबाकीदार ग्राहकांना घेता येणार आहे.

अभय योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

Jalna News
Farmers Protest in Jalna : धरण उशाला, कोरड घशाला! गोदावरीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम

या योजनेअंतर्गत ग्राहकांच्या एकूण थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार शंभर टक्के माफ करण्यात येणार आहे. उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यामध्ये आणखी १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. थकबाकी हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लघुदाब ग्राहकांना ५० टक्के डाउन पेमेंट भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल, तर उच्चदाब ग्राहकांसाठी तीन ते सहा हप्त्यांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, २० किलोवॉटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी वीजपुरवठा पुनर्जोडणीच्या वेळी प्रीपेड मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. अशा ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्क आणि सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

'अभय योजना २०२६-२७'मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि ऑनलाइन आहे. ग्राहकांना महावितरणच्या अधिकृत पोर्टलवरून किंवा मोबाईल अॅपद्वारे योजनेसाठी अर्ज करता येईल.
- दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.