Jalna News : शंभर विद्यार्थिनींच्या क्षमतेचे तीन मजली वसतिगृह सज्ज; चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण

शहरातील नवनिर्मित मातोश्री शासकीय मुलींच्या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व्हावा, यासाठी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
Jalna News
Jalna News : शंभर विद्यार्थिनींच्या क्षमतेचे तीन मजली वसतिगृह सज्ज; चंद्रकांत पाटील यांना निमंत्रणfile photo
Published on: 
Updated on: 

Three-storey hostel with a capacity for 100 female students is ready; invitation extended to Chandrakant Patil

अंबड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नवनिर्मित मातोश्री शासकीय मुलींच्या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व्हावा, यासाठी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच लोकार्पण सोहळ्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

Jalna News
Job Application : नोकरीसाठी २० नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करा

राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या योजनेंतर्गत अंबड येथे १०० विद्यार्थिनींच्या क्षमतेचे हे वसतिगृह मंजूर करण्यात आले होते. या वसतिगृहाची तीन मजली इमारत बांधून पूर्ण झाली असून, त्यामध्ये ३४ निवासी खोल्या, अभ्यासिका, स्नानगृहे, स्वच्छतागृहे, वॉटर कुलर व फिल्टरसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

याशिवाय संरक्षण भिंत, सुरक्षा रक्षक कक्ष, अंतर्गत रस्ते, विद्युत डीपी, पंप हाऊस आणि बोअरवेलची सुविधाही उभारण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ जुलै २०२६ रोज ही इमारत उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळे वसतिगृहाच्या लोकार्पणाचा माग मोकळा झाला आहे.

Jalna News
Jalna News : रब्बी पीकविम्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक

अंबड तालुक्यासह परिसरातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरज विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठ सुरक्षित निवासाची सुविधा य वसतिगृहामुळे उपलब्ध होणार आहे विशेषतः ग्रामीण भागातील मुलींन शिक्षणासाठी बाहेरगावी राहतान येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे. य कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.