रामसगाव येथे प्राचीन नृसिंह मूर्तीलेख आढळला

घनसावंगी तालुक्यात ऐतिहासिक वारसा उजेडात
jalna ancient Nrusimha sculptural inscription was discovered
रामसगाव येथे प्राचीन नृसिंह मूर्तीलेख आढळलाfile photo
Published on
Updated on

An ancient Nrusimha sculptural inscription was discovered at Ramsgaon

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गोदावरी नदीकाठी वसलेल्या रामसगाव येथील प्राचीन नृसिंह मंदिरात एक महत्त्वपूर्ण मूर्तीलेख आढळून आला असून, या शोधामुळे मराठवाड्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशावर नव्याने प्रकाश पडणार आहे. स्थानिक अभ्यासकांच्या या शोधामुळे इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

jalna ancient Nrusimha sculptural inscription was discovered
भाकरीच्या चंद्राची जन्मशताब्दी

मंदिरातील मुख्य नृसिंह मूर्तीच्या खालील पीठावर हा शिलालेख कोर-लेला आहे. देवनागरी लिपीतील मराठी भाषेत एक ओळीचा हा कोरीव लेख असून शिळा अत्यंत गुळगुळीत व चांगल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे, लेखातील अक्षरांची खोदाई अजूनही स्पष्ट असून कोणतीही झीज न झाल्याने लेख सहज वाचता येतो. त्यामुळे या लेखाचे महत्त्व अधिक वाढले आहे. "वासुदेयाचा सुतु षयसुप्रभु" असे या ठिकाणी लिहण्यात आले असुन या लेखाचा अर्थ, वासुदेवाचा पुत्र 'खयसूप्रभू' याने ही मूर्ती घडवली किंवा दान केली, असा होतो. यावरून त्या काळातील दानपरंपरा व धार्मिक श्रद्धेची माहिती मिळते.

मंदिरातील नृसिंह मूर्ती अत्यंत सुबक, आकर्षक व कलात्मक आहे. ही मूर्ती पद्मासन स्थितीत असून चतुर्भुज आहे. नृसिंहाच्या खालील उजव्या हातात पद्म, वरील उजव्या हातात चक्र, खालील डाव्या हातात गदा आणि वरील डाव्या हातात शंख धारण केलेले आहेत. मूर्तीवरील करंडमुकुट, केयूर, कंकण, गळ्यातील हार तसेच पायातील नूपुर या अलंकारांमुळे मूर्तीची शोभा अधिकच खुलून दिसते.

jalna ancient Nrusimha sculptural inscription was discovered
Nashik News | भग्न मूर्तींची विटंबना नव्हे संवर्धन : संपूर्णम फाउंडेशनची देवत्व जपण्याची नवी वाट

नृसिंहाच्या चेहऱ्याभोवती आयाळ असूनही मूर्तीचा भाव शांत, प्रसन्न व सौम्य आहे, ही या मूर्तीची विशेष वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. साध ारणतः नृसिंहाचे उग्र रूप पाहायला मिळते. मात्र येथे सौम्य व पूजनीय रूप दर्शनास येते. त्यामुळे या मूर्तीला धार्मिक तसेच कलात्मक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सदर शिलालेखाचे वाचन अभ्यासक अनिल दुधाणे व अथर्व पिंगळे यांनी केले असून, या संशोधन कार्यासाठी घनसावंगी येथील श्री राजेंद्रराजे जाधवराव देशमुख तसेच धर्माधिकारी ब्राह्मण समाजाचे सहकार्य लाभले आहे. या प्राचीन वारशामुळे रामसगाव परिसराच्या ऐतिहासिक महत्त्वात लक्षणीय भर पडली आहे. या स्थळाच्या संवर्धनाकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असून, या ठिकाणाचा अभ्यास व पर्यटनदृष्ट्या विकास करण्याची

कोरलेला लेख

नृसिंह मूर्तीच्या खाली श्रीविष्णूचे वाहन गरुड कोरलेला असून बाजूलाच हा शिलालेख आढळतो. शिलालेखातील अक्षरांची रचना, शैली व लेखनपद्धती पाहता या मूर्तीचा कालावधी साधारण १४व्या शतकातील असावा, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news