Ambad News : ‘नीट’चा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थिनीने जीवन संपवले

अंबड पोलिसांत घटनेची नोंद
Student Death News
‘नीट’चा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थिनीने जीवन संपवले pudhari photo
Published on
Updated on

अंबड : नीट परीक्षेचा पेपर अपेक्षेप्रमाणे व्यवस्थित न गेल्याने आलेल्या नैराश्यातून अंबड येथील एका तरुण विद्यार्थिनीने २२ जुलै रोजी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मिस्बा खलील शेख असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिस्बाचे वडील पेशाने शिक्षक आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी (मिस्बा) अशी दोन अपत्ये आहेत. नेहमीप्रमाणे कुटुंब घरात असताना, मिस्बाची आई गच्चीवर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. त्याच वेळी मिस्बाने घरात गळफास घेतला. आई गच्चीवरून खाली आल्यानंतर तिला मिस्बा गळफास घेतलेल्या आणि लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

Student Death News
Neet Exam Paper Leak : ‘माझा पेपर चांगला गेला होता, आता पुढे काय होणार?‘ ; नीट रद्द झाल्यामुळे विद्यार्थिनीने संपवले जीवन

हा प्रकार पाहताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तत्काळ आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मिस्बाने वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेली 'नीट' परीक्षा दिली होती. मात्र, हा पेपर तिला कठीण गेल्याने आणि तो व्यवस्थित न सुटल्याने ती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होती. याच नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Student Death News
NEET paper leak | 'पेपरफुटीप्रकरणी NTA ने अद्याप कोणताही धडा घेतलेला नाही' : सर्वोच्च न्यायालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news