Jalna Crime : स्कार्पिओची काच फोडून १ लाख १० हजार लंपास; अंबड शहरात चोरीने खळबळ

पुलवामा दहशतवादी प्रकरणात नाव असल्याची बतावणी
Scorpio Car Theft
अंबड : शहरातील रजिस्ट्री कार्यालयामागे उभ्या केलेल्या कारची काच फोडून कारमधील १ लाख १० हजार लांबविले. (छायाः राजेंद्र कळकटे)
Published on: 
Updated on: 

अंबड : अंबड शहरातील रजिस्ट्री कार्यालयाच्या पाठीमागे उभ्या केलेल्या काळ्या रंगाच्या स्कार्पिओ कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी कारमधुन १ लाख १० हजार रुपयांची रोकड लंपास केली. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जालना तालुक्यातील आंतरवाली येथील गणेश वैजिनाथ सुळसुळे हे मित्रांसह काळ्या रंगाच्या स्कार्पिओ (क्र. एमएच २१ सीए ३८३९) मधुन सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अंबड येथील आयडीबीआय बँकेत आले होते. त्यांच्याकडे दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये भरणा करण्यासाठी दोन लाख रुपये होते. त्यापैकी एका खात्यात त्यांनी ९० हजार रुपये जमा केले. मात्र, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे खाते होल्ड असल्यामुळे त्यांना उर्वरित १ लाख १० हजार रुपये जमा करता आले नाहीत.

Scorpio Car Theft
Chhatrapati Sambhajinagar News : कन्नड तालुक्यात दुष्काळाचा यंदा रब्बी हंगामाला फटका

त्यामुळे सदर रक्कम त्यांनी गाडीच्या पुढील सीटसमोरील डॅशबोर्डच्या कप्प्यात ठेवली होती. त्यानंतर ते दुपारी साडेतीनच्या सुमारास स्कार्पिओ कार रजिष्ट्री कार्यालयाच्या पाठीमागे उभी करून ते कार्यालयीन कामासाठी गेले. सुमारे दोन तासाने ते साडेपाचच्या सुमारास काम आटोपून गाडीजवळ आले असता त्यांना कारच्या दरवाजाची काच फुटलेली दिसून आली. त्यांनी कारची तपासणी केली असता डॅशबोर्डच्या कप्प्यात ठेवलेले १ लाख १० हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कारमध्ये मागील सीटवर ठेवलेल्या बॅगाही चोरट्यांनी अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष घोडके यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Scorpio Car Theft
Maharashtra Wedding Season : दुष्काळाच्या सावटात यंदा ७७ विवाह मुहूर्त

पोलिसांसमोर आव्‍हान

शहरातील रजिस्ट्री कार्यालय परिसरात नागरिकांची वर्दळ असते. गजबजलेल्या ठिकाणी चोरट्यांनी गाडीची काच फोडून रोकड लंपास केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, भरदिवसा झालेल्या चोरीच्या तपासाचे आव्हान पोलिसांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.