Maharashtra Wedding Season : दुष्काळाच्या सावटात यंदा ७७ विवाह मुहूर्त

पाणीटंचाईमुळे विवाह सोहळ्यांच्या नियोजनाचे आव्हान; तुळशी विवाहानंतर लग्नसराईची धूम
wedding season
wedding seasonpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुकेश भारद्वाज

जाफराबादः तुळशी विवाहाचा मंगल सोहळा पार पडताच आता शहरासह ग्रामीण भागात लग्नसराईची धामधूम सुरू होणार आहे. नोव्हेंबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत तब्बल ७७ विवाह मुहूर्त उपलब्ध असल्याने वधू-वरांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, एकीकडे विवाहाचा उत्साह तर दुसरीकडे दुष्काळ आणि पाणीटंचाईचे सावट असल्याने यंदा विवाह सोहळ्यांचे नियोजन करताना कुटुंबीयांना आर्थिक आणि पाण्याच्या उपलब्धतेचे आव्हान पेलावे लागणार आहे.

यंदा २१ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्त उपलब्ध होत असल्याने लग्नाच्या तयारीला वेग आला आहे. विशेषतः डिसेंबर, फेब्रुवारी, मे आणि जून महिन्यांत विवाह मुहूर्तांची संख्या अधिक असल्याने या काळात लग्नसोहळ्यांची मोठी रेलचेल पहायला मिळणार आहे.

wedding season
Jalna Irrigation Wells : कोटींचा खर्च, रखडलेले सिंचन; ११००० सिंचन विहिरी अपूर्ण

दरम्यान, जाफराबाद तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भूजलपातळीत घट झाली असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत विवाह सोहळ्यांसाठी लागणारे पाणी, भोजन व्यवस्था, पाहुण्यांची व्यवस्था आणि इतर कार्यक्रमांचे नियोजन करणे कुटुंबीयांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

विशेषतः ग्रामीण भागात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन विवाह सोहळ्यांचे नियोजन करावे लागणार आहे. यंदाच्या लग्नसराईत खर्चाला आवर घालत साधेपणाने विवाह सोहळे पार पाडण्याकडे अनेक कुटुंबांचा कल राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

wedding season
Chhatrapati Sambhajinagar Honey Trap : 'पुलाव'च्या बहाण्याने बोलावून एमआरला अडकवले 'हनी ट्रॅप'मध्ये !

२०२६ मधील शुभमुहूर्त

  • नोव्हेंबर : २१, २४, २५

  • डिसेंबर : २, ३, ४, ६, ११, १२

२०२७ मधील विवाह मुहूर्त

  • जानेवारी : २६, २७, २९

  • फेब्रुवारी : २, ३, १०, ११, २२, २३, २५, २६, २७, २८

  • मार्च : २, ३, ४, ९, १०, १४

  • एप्रिल : ५, १९, २२, २३, २४, २५, २६, २७, २८

  • मे : ४, ७, ९, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, ३०, ३१

  • जून : १, ५, ९, १०, ११, १२, १३, १५, १६, १७, १९, २०, २२, २६, २७, २८

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.