Chhatrapati Sambhajinagar News : कन्नड तालुक्यात दुष्काळाचा यंदा रब्बी हंगामाला फटका

जमिनीत ओलाव नसल्याने आतापर्यंत केवळ ३ हजार ५१५ हेक्टरवर पेरणी
Rabi Sowing Maharashtra
Rabi Sowing Maharashtrapudhari photo
Published on: 
Updated on: 

संजय मूचक

कन्नड : तालुक्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा रब्बी हंगामातील पेरणीवर परिणाम झाला आहे. पावसाअभावी शेतजमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा यांसह रब्बी पिकांच्या पेरणीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी पिकांच्या पेरणी क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या १८ नोव्हेंबरच्या पेरणी अहवालानुसार तालुक्यात ऊस वगळता आतापर्यंत ३ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या अंतिम पेरणी अहवालानुसार तालुक्यात तब्बल ८० हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदाची सुरुवातीच्या टप्प्यातील पेरणी अत्यल्प आहे.

Rabi Sowing Maharashtra
Jalna Crime : किराणा दुकान फोडून लाखाचा ऐवज लंपास; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी, पेरणीसाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली नाही. विशेषतः ज्वारी आणि हरभरा ही रब्बी हंगामातील प्रमुख पिके घेण्यासाठी आवश्यक असलेला जमिनीतील ओलावा उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी टाळली आहे.

तालुक्यात ज्वारीची ४८५ हेक्टर, हरभऱ्याची १ हजार १८ हेक्टर, गव्हाची ८९७ हेक्टर आणि मक्याची ९४८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. इतर पिकांचे क्षेत्र तुलनेने कमी आहे.हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील हा अहवाल असल्याने पुढील काळात पेरणी क्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, जमिनीत ओलावा नसणे आणि पाण्याची टंचाई यामुळे यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.

Rabi Sowing Maharashtra
Jalna Irrigation Wells : कोटींचा खर्च, रखडलेले सिंचन; ११००० सिंचन विहिरी अपूर्ण

तालुक्यातील रब्बी पेरणीची सद्यस्थिती

पीक पेरणी क्षेत्र (हेक्टर)

ज्वारी ४८५, मका ९४८, गहू ८९७, हरभरा १,०१८, इतर तृणधान्य ६४, इतर कडधान्य १५, सूर्यफूल ३४, करडई १४, इतर गळीतधान्य ४०,एकूण (उसाशिवाय) ३,५१५, ऊस नवीन लागवड १५, ऊस (गाळपासाठी) ३३७,एकूण (ऊसासह) ३,८६७.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.