

Ambad Rape Case
अंबड : जांब समर्थ कोठाळा ता.घनसावंगी ह.मु सुरंगे नगर अंबड येथील एका महिलेवर मोहन मुंढे यांनी लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केल्याची घटना घडली असून या बाबत सदरील महिलेच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात मंगळवार दि.२४ जून रोजी उशिराने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित महिला ही आपले आई वडील व मुलासह सुरंगे नगर येथील एका (भाड्याच्या) किरायाने घेतलेल्या खोलीत राहते फिर्यादी महिला व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असल्याने दोघांमध्ये बोलणे चालणे सुरू होते मात्र नंतर एक दिवस आरोपीने फिर्यादिस सांगितले की तू मला खूप आवडतेस तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. असे आमिष दाखवून आरोपी मोहन मुंढे याने फिर्यादी महिलेशी अनैतिक संबंध ठेवले. बघता बघता दोघेही अत्यंत जवळ आले. आणि दोघेही एकमेकावर प्रेम पूर्वक एकमेकांच्या शारीरिक सुखाचा उपभोग घेऊ लागले.
काही दिवस उलटल्यानंतर फिर्यादी महिलेने आरोपी मोहन मुंढे यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला परंतु मोहन मुंढे याने महिले सोबत लग्न करण्यास नकार देत, मी आपल्या दोघांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करील असे सांगून फिर्यादी महिलेला शिवीगाळ तसेच तुझ्या मुलाला व आई वडिलांना जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली.
त्यामुळे पीडित महिलेने अंबड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यावरून आरोपी मोहन शेषराव मुंढे याच्या विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात कलम ६९,३५२,३५१,(२) भान्यासं २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आदीनाथ ढाकणे हे करीत आहे.
मोहन मुंढे हे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष असून जिल्ह्यात त्यांचे चांगले काम असल्याचे बोलले जाते मोहन मुंढे यांनी प्रहार दिव्यांग संघटना अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यात तसेच संपूर्ण मराठवाड्यात अनेकदा मोठमोठी आंदोलने केली. दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी मोहन मुंढे हे सतत पुढाकार घेऊन दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत.