

Young Man Killed in Accident
अंबड : अंबड तालुक्यातील घु. हादगाव येथे अण्णासाहेब नामदेव गव्हाणे (वय 38) याचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला . ही घटना आज (दि.२४) दुपारी १ च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, घु.हादगाव शिवारातील शेतामध्ये रोटा मारून तरूण घराकडे जात होता. यावेळी चिखल्यामुळे ट्रॅक्टर चारीत घसरला. यात तरुण खाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला. जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर चारीचा बाजूला घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला. गोंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
गोंदी पोलीस ठाण्याचे जमादार गोपाल दिलवाले, शाकेर सिद्दिकी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नातेवाईकांनी जखमीला खासगी रूग्णालयात दाखल केले.