Jalna Illegal Sand Mining : गोदावरी नदीपात्रातून २५० ब्रास वाळूची चोरी

नऊ जणांसह अन्य ३० ते ४० जणांवर गुन्हा; गोंदी पोलिसांनी केली कारवाई
Jalna Illegal Sand Mining
Jalna Illegal Sand Miningpudhari photo
Published on: 
Updated on: 

अंबड : अंबड तालुक्यातील शहागड जवळ गोरी या गावाच्या हद्दीत गोदावरी नदीपात्रातून अंदाजे २०० ते २५० ब्रास वाळूचे अवैध उत्खनन करून वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी नऊ जणांसह अन्य ३० ते ४० जणांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात २९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्राम महसूल अधिकारी दीपक संजय गवारे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. विधानपरिषद पदवीधर निवडणुकीच्या कर्तव्याचा फायदा घेत २२ ते २५ ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Jalna Illegal Sand Mining
Jalna Crime : पालकांनो सावधान ! अल्पवयीन मुलांच्या हातात तलवारी, खुनाच्या गुन्ह्यात समावेश

विधानपरिषद पदवीधर निवडणुकीच्या कामकाजात महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याची संधी साधून गोरी येथील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन करण्यात आल्याची तक्रार महसूल विभागाला प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २६ ऑक्टोबर रोजी ग्राम महसूल अधिकारी दीपक गवारे यांनी पोलिस पाटील निवास येटाळे व महसूल सेवक शारदा देवकते यांच्यासह संबंधित नदीपात्राची पाहणी केली.

यावेळी गोरी येथील गोदावरी नदीपात्रातील गट क्रमांक ८, १०८ व १०९ मध्ये पाहणी करण्यात आली. या ठिकाणी ट्रॅक्टर व यांत्रिक साधनांच्या साहाय्याने नदीपात्रातून वाळूचा उपसा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच उत्खनन केलेली वाळू लोडरच्या साहाय्याने ट्रॅक्टरमध्ये भरून तिची वाहतूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या परिसरातून अंदाजे २०० ते २५० ब्रास वाळूचे अवैध उत्खनन करून वाहतूक व विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Jalna Illegal Sand Mining
Jalna Diwali Market : दिवाळीच्या स्वागतासाठी जालना बाजारपेठ सजली

दरम्यान, निवडणूक कर्तव्याच्या काळात गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाल्याचा प्रकार महसूल विभागाच्या पाहणीतून समोर आला आहे. नदीपात्रातील नैसर्गिक संपत्तीचे अशा प्रकारे अवैध उत्खनन होत असल्याने परिसरातील वाळू चोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महसूल विभागाची चौकशी

महसूल विभागाने केलेल्या स्थानिक चौकशीत दादासाहेब तिळवणे, अर्जुन तिळवणे, प्रदीप तिळवणे, राम दिगंबर तिळवणे, विशाल थोरे, योगेश अडागळे, मोहन पवार, किशोर पल्हारे, विशाल मस्के यांच्यासह अन्य ३० ते ४० जणांचा यात सहभाग असल्याचे म्हटले आहे. ग्राम महसूल अधिकारी दीपक गवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.