Jalna Diwali Market : दिवाळीच्या स्वागतासाठी जालना बाजारपेठ सजली

आकर्षक आकाशकंदील, लक्ष्मीच्या मूर्ती अन्‌ फुलांच्या माळा बाजारात
Jalna Diwali Market
जालना : शहरात दिवाळीसाठी विक्रीसाठी आलेले आकर्षक आकाशकंदील. (छायाः किरण खानापुरे)
Published on: 
Updated on: 

जालना : दिवाळीच्या स्वागतासाठी जालना बाजारपेठ सज्ज झाली असून ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. बाजारात आकर्षक आकाशकंदील, रंगीबेरंगी विजेच्या माळा, मनमोहक फुलांच्या माळा आणि माता लक्ष्मीच्या मूर्तींनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.

जालना बाजारात पारंपरिक कागदी कंदिलांपासून ते आकर्षक प्लास्टिक, कापडी आणि इको-फ्रेंडली (पर्यावरणपूरक) कंदिलांची मोठी रेलचेल झाल्याचे पहावयास मिळत आहे. घराची सजावट करण्यासाठी विविध डिझाईन्सच्या एलईडी माळा, फिरते दिवे आणि रांगोळीच्या आकाराचे लाईट्स उपलब्ध बाजारात उपलब्ध झाले आहेत.

Jalna Diwali Market
India Poverty Reduction 2026 : १२ वर्षांत ५० कोटी नागरिक दारिद्र्यरेषेबाहेर

धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या लक्ष्मी देवीच्या पितळी, शाडूची माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अत्यंत देखण्या व आकर्षक मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत.दिवाळीसाठी सुवासिक उटणे, सुगंधी तेल, रांगोळीचे रंग, नक्षीदार पणत्या आणि फराळाचे पदार्थ बाजारात विक्रीसाठी आले आहेत.

दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली असून, दीपोत्सवाचा सण जवळ आल्याने आकर्षक आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी आले आहेत. टिकाऊ आणि इको-फ्रेंडली वस्तूंपासून तयार केलेल्या कंदिलांना अधिक मागणी होताना दिसत आहे. विविध आकार, प्रकार आणि आकर्षक नक्षीकाम केलेले ३ इंचापासून ते ६ फुटांपर्यंतचे आकाशकंदील बाजारात विक्रीस आले असून नागरिकांचा खरेदीकडे अधिक कल दिसून येत आहे.

Jalna Diwali Market
Sambhajinagar Water Issue : पाणी मिळाले नाही तर सर्वांच्या आधी मीच रस्त्यावर उतरणार

बाजारात ५० रुपये डझनपासून ते ५,००० रुपयांपर्यंत एक या दराने आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे आकाशकंदिलांच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. षटकोनी, डायमंड, स्टार, चौकोन, खणाचे कंदील, जाणता राजा, स्वामी समर्थ, फोटो फ्रेम तसेच वॉटरप्रूफ आणि मॅजिक स्टार अशा विविध प्रकारांत आकाशकंदील विक्रीस आले आहेत. खणाची साडी, वेलवेट कापड, रंगबिरंगी साधे आकर्षक कापड, बांबूपासून तयार कामट्या, पुठ्ठा, ज्युट, ओली पेपर, लेस व रेशमी दोरी यांचा वापर आकाशकंदील बनवण्यासाठी केला जातो.

पारंपरिक आकाशकंदिलांना मागणी

चीनमधून विविध प्रकारचे आकर्षक आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी येत असत. त्यांचे दरही कमी असल्यामुळे नागरिकांचा त्यांच्या खरेदीकडे अधिक कल होता. मात्र, चायनीज वस्तूंवर बंदी घातल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बाजारात चायना आकाशकंदील दिसणे कमी झाले आहेत. परिणामी, पारंपरिक आकाशकंदिलांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, कंदील विक्रेत्यांकडूनही याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.