Jalna Crime : पालकांनो सावधान ! अल्पवयीन मुलांच्या हातात तलवारी, खुनाच्या गुन्ह्यात समावेश

चंदनझिरा पोलिसांची कारवाई; दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून चार धारदार तलवारी जप्त
Jalna Minor Boys Crime
जालनाः चंदनझिरा पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या चार तलवारी. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी.pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : दिवसेंदिवस अल्पवयीन बालके गुन्हेगारीकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे दिसून येत आहे. खेळण्या बागडण्याच्या दिवसात ही अल्पवयीन मुलं सर्रासपणे गावठी कट्टे आणि तलवारी बाळगत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. अशीच एक कारवाई गुरुवार, दि. २९ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. दोन अल्पवयीन मुलांना चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारीत वाढत असलेला अल्पवयीन मुलांचा सहभाग हा येत्या काळात थोक्याची घंटा ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याच्या धोरणात्मक भूमिकेतून, चंदनझिरा पोलिसांनी एक मोठी धड़क कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन बालकांकडून तब्बल १० हजार रुपये किमतीच्या चार धारदार तलवारी जप्त केल्या असून, त्यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Jalna Minor Boys Crime
Jalna Diwali Market : दिवाळीच्या स्वागतासाठी जालना बाजारपेठ सजली

पोलिस स्टेशन चंदनझिरा येथे दैनंदिन कामकाज सुरू असताना, गोपनीय बातमीदाराकडून पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांना माहिती मिळाली की, दोन इसम पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये धारदार तलवारी घेऊन इंद्रायणी चौक, चंदनझिरा येथून महात्मा फुले चौकाच्या दिशेने जात आहेत. या अत्यंत गोपनीय माहितीची गांभीर्याने दखल घेत, पोलीस निरीक्षक बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ पोलिस पथक आणि पंचांसह महात्मा फुले चौक, चंदनझिरा येथे सापळा रचण्यात आला.

दरम्यान, सायंकाळी साडेअहा वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती हातात पांढरी गोणी घेऊन जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिस पथकाने प्रसंगावधान राखून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्यांच्याकडील गोणीची झडती घेतली असता, त्यात ३ लोखंडी थातूच्या आणि १ स्टील धातूची अशा एकूण ४ धारदार तलवारी मिळून आल्या, ज्यांची अंदाजे किंमत १०,००० रुपये आहे. याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक डॉ. विक्रम साळी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बिडवे, सफौ मनसुब वेताळ, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजेंद्र पवार, अभिजीत वायकोस, शिवाजी जमधडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणा-यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Jalna Minor Boys Crime
CBSE New Exam Rules : सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना तारणार 'कौशल्य'!

खुनाच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी; धोक्याची घंटा

या कारवाईतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पकडलेल्या दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांविरुद्ध यापूर्वीही चंदनझिरा पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अल्पवयीन मुलांचा वाढता गुन्हेगारी प्रवृत्तीकडील कल हा संपूर्ण समाजासाठी आणि पालकांसाठी अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे.

मुलांकडे संशयास्पद वस्तू आढळ्यास माहिती द्या-आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाच्या विळख्यात अडकत आहेत. चित्रपट, वेब सिरीज आणि चुकीच्या संगतीमुळे अल्पवयीन मुले अशा बेकायदेशीर कृत्यांकडे आकर्षित होत आहेत. पाल्यांच्या वर्तनावर, मोबाईल वापरावर व मित्रपरिवारावर विशेष लक्ष ठेवावे. मुलांकडे संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवता येईल.

किरण बिडवे, पो. नि. चंदनझिरा पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.