

'AI Proctor Cameras' Keep an Eye on Exam Cheating
जालना, पुढारी वृत्तसेवा परीक्षांमधील सामूहिक कॉपी वइतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने यंदा प्रथमच चाय लॅब्स इनोव्हेशन्स एलएलपी आणि सोशल पिल यांच्या तंत्रिक साह्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) आधारित प्रॉक्टर कॅमेरा प्रणालीचा अभिनव प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाने सामूहिक गैरप्रकारांना आळा घालण्यात यश मिळाले असल्याचे दिसून आहे.
दरम्यान, दि.२० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी व १२वी बोर्ड परीक्षांमध्ये जिल्ह्यातील पाच संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ५० ए. आय. सक्षम सीसीटीव्ही कॅमेरे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच बसविण्यात आले होते.
प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या प्रकल्पात कॅमेऱ्यांमध्ये प्रगत विश्लेषण क्षमता (अॅडव्हान्स अॅनलिसिसीस्) बसविण्यात आल्याने परी-क्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य झाले. ए.आय. प्रणालीद्वारे संशयास्पद हालचाली, गटाने बसून कॉपी करण्याचा प्रयत्न, वारंवार इकडे-तिकडे पाहणे, अनधिकृत वस्तूंचा वापर यांसारख्या बाबींची तातडीने वेळेवर ओळख करण्यात आली.
प्रत्येक संशयास्पद घटनेवर त्वरित अलर्ट प्रणालीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. ज्यामुळे तातडीने हस्तक्षेप करून गैरप्रकार रोखणे शक्य झाले, असल्याचे यातून दिसून आले आहे.
या केंद्रावर बसवले होते कॅमेरे...!
लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय, (सेवली ता. जि. जालना), श्रीमती इंदिरा गांधी उच्च मध्यमिक विद्यालय, रामनगर (सा.का.), कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, बदनापूर, सिध्द-`श्वर उच्च माध्यमिक शाळा, (ढोकसाळ, ता. मंठा), पाथ्रीकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बदनापूर या केंद्रावर यशस्वी प्रयोग करण्यात आला