Jalna News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार संतोष दानवे यांच्याकडून पीक पाहणी

दुष्काळग्रस्त तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही : आ. दानवे
Jalna News
Jalna News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार संतोष दानवे यांच्याकडून पीक पाहणीfile photo
Published on
Updated on

Jalna News : Crop inspection by MLA Santosh Danve in the wake of drought

आन्वा, पुढारी वृत्तसेवाः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार संतोष दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील तालुक्यातील आन्वा, वाकडी, कुकडी, कोदा या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून खरीप पिकांची परिस्थिती, पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

Jalna News
Women Farmer Certification : महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू

पावसाचा खंड पडल्याने पिकांवर परिणाम झाला असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार संतोष दानवे यांनी दिले. दुष्काळग्रस्त तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अश सूचनाही त्यांनी दिल्या. संकटाच्य काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.

Jalna News
Swami Govindadevgiri : समाजहितासाठी काम करताना टीका पचविण्याची क्षमता अंगी असली पाहिजे

पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने अनेक ठिकाण शेतातील पिके करपून गेली असून पावसात पडलेला खंड आणि उन्हाच तीव्र चटका यामुळे गंभीर स्थिती निर्माण झालेल्या भोकरदन जाफराबाट तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली आहे. असेह आमदार संतोष दानवे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news