कान फाडणाऱ्या २४ वाहनांवर कारवाई

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या २४ बुलेट गाड्यांविरोधात शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली.
Jalna News
कान फाडणाऱ्या २४ वाहनांवर कारवाईFile Photo
Published on
Updated on

Action was taken against 24 Bullet motorcycles that were making loud, jarring noises and had fancy number plates

जालना, पुढारी वृत्तसेवा :

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या व फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या २४ बुलेट गाड्यांविरोधात गुरुवार दि. २२ रोजी शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली आहे.

Jalna News
jalna news : थकीत लोनप्रकरणी मालमत्ता जप्त; एसबीआय बँकेची कारवाई

गुरुवारी शहर वाहतूक शाखेच्या वतीने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बुलेट गाड्यांना अडवून तपासणी करण्यात आली. बेकायदेशीर सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड ठोठावण्यात आला.

Jalna News
जालन्याचा कारभारी कोण ? चार नगरसेविकांमध्ये चुरस

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरि. प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक शेळके. पोहे किरण कणखर, कायंदे, बोरकर, पवार, बनसोडे, पोशि. चव्हाण, कुंडलकर, घुले, महिला पोलीस शिपाई क्षीरसागर, पोशि. सुलाने, घोडके, तडवी, पोलीस शिपाई लामगे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news