जालन्याचा कारभारी कोण ? चार नगरसेविकांमध्ये चुरस

आरक्षण जाहीर होताच जालन्यात राजकीय हालचालींना वेग
Jalna Mayor News
जालन्याचा कारभारी कोण ? चार नगरसेविकांमध्ये चुरसFile Photo
Published on
Updated on

Who will be the mayor of Jalna? There is tough competition among four corporators

जालना, पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. आतापर्यंत विविध समीकरणांवर आधारित असलेले महापौर पदाचे गणित आता पूर्णतः बदलले असून, महिला नेतृत्व केंद्रस्थानी आले आहे.

दरम्यान, महापौर पदाच्या शर्यतीत आता चार प्रमुख नगरसेविकांची नावे पुढे आली आहेत. यात रुपाली कुरील, वंदना अरुण मगरे, श्रद्धा साळवे आणि अॅड. रिमा खरात काळे यांचा समावेश आहे. या चारही नगरसेविका अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडूण आल्या आहे. या चार पैकी कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सत्ताधारी गटात अंतर्गत चाचपणी सुरू असून, पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर चर्चा झपाट्याने होत आहेत. एकीकडे संघटनात्मक ताकद, अनुभव आणि प्रशासनावर पकड या मुद्द्यांचा विचार केला जात असताना, दुसरीकडे आगामी राजकीय समीकरणे आणि मतदारांवर होणारा परिणामही लक्षात घेतला जात आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्याबाबत पक्ष सावध भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता आणली आहे. ४१ जागा आणून सत्ता स्थापनेचे दावेदार झाले आहे. मात्र, महापौर पदाचे आरक्षण खुला प्रवर्ग व ओबीसी प्रवर्गातून सुटले असते तर तशी सोय भाजपाने करुन ठेवली होती. मात्र, आता अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांना आता मुरड घालावी लागणार आहे.

दरम्यान, शहरातील नागरिकांमध्येही या बदलाबाबत चर्चा सुरू आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित झाल्यामुळे सामाजिक समतेचा संदेश मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता कोणत्या नगरसेविकेवर पक्षाचा शिक्का बसेल आणि जालनाला पहिली महिला महापौर म्हणून कोण नेतृत्व करेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लवकरच होणार निवडणूक प्रक्रिया

भाजपाची महापालिकेवर एकहाती सत्ता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपाचाच महापौर होणार आहे. अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गासाठी आरक्षण सुटले. त्यामुळे येत्या काही दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन जालन्याचा प्रथम नागरिक मिळणार आहे. तो पर्यंत तरी शहरात चर्चेला उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news