Jalna Crime News : गांजाची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

४ किलो ११० ग्रॅम गांजासह २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Jalna Crime News
Jalna Crime News : गांजाची वाहतूक करणाऱ्यावर कारवाईfile photo
Published on
Updated on

Action taken against person transporting cannabis

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरात अमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना-अंबड रोडवरील राजेश्वर हार्डवेअरसमोर कारवाई करून ४ किलो ११० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह एक मोटारसायकल, मोबाईल असा एकूण २ लाख ५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Jalna Crime News
Soybean Crop : ९७० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड

अमली पदार्थांची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तेजस्वी सिंह संधू व अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांनी दिले होते. त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जालना-अंबड रोडवरील राजेश्वर हार्डवेअरसमोर एक व्यक्ती गांजाची चोरी-विक्री व वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी सापळा रचून संशयित श्याम विठ्ठलराव ठाणगे (रा. शंकरनगर, जुना जालना) याच्यासह अन्य एका जणास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ किलो ११० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत १ लाख ५२ हजार ७५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Jalna Crime News
Jalna News : नऊ जणांचे आजपासून आमरण उपोषण

याशिवाय ९० हजार रुपये

किमतीची मोटारसायकल, १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच गांजा पॅकिंगसाठी वापरलेले साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण २ लाख ५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी श्याम विठ्ठलराव ठाणगे याच्यासह दीपक या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

यांनी केली कारवाई

जालना तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news