Road safety enforcement drive : विनाहेल्मेट 14 दुचाकीस्वारावर कारवाई

‌‘हेल्मेट नाही, प्रवेश नाही‌’ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राबविला उपक्रम
Road safety enforcement drive
जालना ः कारवाई करताना आरटीओचे अधिकारी. (छाया ः पंकज कुलकर्णी)
Published on
Updated on

जालना : जिल्हाधिकरी आशिमा मित्तल यांनी बुधवारी दि. 11 रोजी जिल्हाधिकारी कर्यालयात प्रवेश करणाऱ्या अधिकरी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही हेल्मेट सक्तीचे आदेश काढले होते. त्या आदेशाची अंमलबजावनी गुरूवार दि. 12 रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या वेळी एकू 14 दुचाकीस्वारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अर्शन खान तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी रघुनाथ आंभोरे यांच्या संयुक्त सहभागातून प्रभावीपणे राबविण्यात आली. दरम्यान, या मोहिमेचा उद्देश रस्ता सुरक्षितता वाढविणे, वाहनचालकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करणे तसेच अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे.नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा व वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Road safety enforcement drive
CITU-led workers protest : सिटूचा दीड तास ‌‘रास्ता रोको‌’; जिल्हाकचेरीवर मोर्चा

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यात सर्व शासकीय विभाग व खाजगी आस्थापना मध्ये हेल्मेट नाही, प्रवेश नाही हा उपक्रम राबविला जात आहे. जालना जिल्ह्यात रस्ते अपघातात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी ही चिंताजनक बाब आहे.

यामुळे नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Road safety enforcement drive
Beed News : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 11 वसतिगृहे

हेल्मेटचा वापर करावा- नागरिकांनी दुचाकी चालवताना स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा. आणि वाहतूक नियमाचे पालन करावे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार ही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनी सहकार्य करावे. आवाहन हेल्मेटचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे.

चंद्रमोहन चिंतल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news