Jalna Crime : जबरी चोरी प्रकरणातील फरार आरोपी अटकेत; लुटलेली रक्कम जप्त

फावड्याने डोक्यावर वार करून जखमी केल्याची तक्रार दाखल
Jalna Crime News
जबरी चोरी प्रकरणातील फरार आरोपी अटकेत; लुटलेली रक्कम जप्तpudhari photo
Published on
Updated on

जालना : कदीम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील फरार आरोपीस पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून लुटलेली रोख रक्कम जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जून 2026 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नूतन वसाहत परिसरात आरोपी ऋषिकेश दीपक कांबळे (रा. नूतन वसाहत, जुना जालना) याने तक्रारदार सुभाष काळुके यांना अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या जवळील 1 हजार 630 रुपये रोख रक्कम हिसकावून घेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फावड्याने डोक्यावर वार करून जखमी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

Jalna Crime News
Nanded Robbery | उमरखेड घरफोडीचा छडा: हैदराबाद येथून दोघांना अटक, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिस पथकाने त्यास अटक केली. त्याच्याकडून 1हजार 630 रुपये रोख रक्कम जप्त केली.ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजबीर सिंह संधू, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जे. बी. शेवाळे यांनी केली.

Jalna Crime News
Fake Umrah visa fraud-'उमराह खिदमत'च्या नावाखाली बनावट व्हिसा देत तरुणांची फसवणूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news