

A unique protest against the administration with blindfolds over the eyes
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा :
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्यांचा आवाज गुन्हा दाखल करून दाबला जात असल्याचा आरोप करत बुधवार दि. ३१ रोजी सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांच्यासह इतरांनी डोळ्याला पट्टी व हाताला दोरी बांधून अनोखे आंदोलन केले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव व बळीराजा फाउंडेशनचे नारायण लोखंडे यांनी सुरू केले होते. सरपंच मंगेश साबळे यांनी डफली आंदोलन करत आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तत्काळ उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्या व उपोषण सुटले.
मात्र उपोषण सुटून अवघ्या तीन दिवसांनंतर नायब तहसीलदार यांनी सरपंच मंगेश साबळे यांच्यासह १२ सहकाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.