

Dr. Sanjeevani Tadegaonkar has been elected as the president of the literary conference.
जालना, पुढारी वृत्तसेवाः सुब्रमण्य साहित्य अकादमीच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) जिल्ह्यातील माचीगड-अनगडी येथे आयोजित २९ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी ख्यातनाम कवयित्री, लेखिका डॉ. संजीवनी तडेगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
माचीगड येथील श्री सुब्रमण्य मंदिराजवळ असलेल्या गिरीबंधू पटांगणात ०४ जानेवारी रोजी होणाऱ्या एक दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, ग्रंथ प्रदर्शन, कविसंमेलन, व्याख्यान, हास्ययात्रा एक विनोदी प्रयोग अशी भरगच्च उपक्रमांची रेलचेल असणार असल्याचे अकादमीचे सचिव एम. पी. गिरी यांनी पत्राद्वारे कळविले. संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्याबद्दल डॉ. संजीवनी तडेगांवकर यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
डॉ. संजीवनी तडेगावकरांची झेप साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर, लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन नांदेड, अक्षरयात्री ग्रामीण साहित्य संमेलन विटा, सांगली, मराठवाडा साहित्य परिषदेचे शिक्षक साहित्य संमेलन उदगीर, शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगर या साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविलेली आहेत.