Jalna Crime News : भररस्त्यातील खुनाचा अवघ्या चार तासांत छडा

परराज्यात पसार होण्यापूर्वी सेलू येथून संशयित आरोपी जेरबंद
Jalna Crime News
Jalna Crime News : भररस्त्यातील खुनाचा अवघ्या चार तासांत छडाfile photo
Published on
Updated on

A murder on a busy street was solved in just four hours

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील स्काऊट गाईड कार्यालयासमोर भररस्त्यात झालेल्या युवकाच्या निघृण खुनाचा कदीम जालना पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावत मुख्य आरोपीला अटक केली. वेगवान तपास, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला परराज्यात पसार होण्यापूर्वीच परभणी जिल्ह्यातील सेलू येथून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा अत्यंत कमी वेळेत कदीम जालना पोलिसांनी उलगडा केला आहे. या संदर्भात बुधवार, दि. २९ रोजी अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

Jalna Crime News
Sambhajinagar News : मनपाकडून सिटी बसच्या अनावश्यक खर्चाला कात्री

दरम्यान, मंगळवार, दि. २८ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन महानगरपालिकेच्या असलेल्या स्काऊट रोडवरील बाजूला गाईड कार्यालयासमोर एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची माहिती कदीम जालना पोलिस ठाण्याला मिळाली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जनार्धन शेवाळे, सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव व अमित मस्के यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

मोबाईल फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून घटनास्थळ सील करण्यात आले. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी मयत मयूर नंदकिशोर मेंढरे (वय २४, रा. खडकपुरा, जालना) यांच्या आईच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 412/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Jalna Crime News
Crime News : तरुणाचा खून करून मृतदेह शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाकला

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव यश शिवलिंग वीर (वय 22, रा. म्हाडा कॉलनी, शिवाजीनगर, नवीन जालना) असे आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार व इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव करीत आहेत. ही कारवाई तेघबीरसिंग संधु, पोलीस अधीक्षक, जालना, विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक, जालना, अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे. बी. शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, अमित मस्के, पोउपनि दिनकर मोरे, पोहेकॉ सचीन चौधरी, पोहेका सदा राठोड, पोकों मतीन शेख, इम्रान खान, साळवे, संदीप चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विलास राऊत, दिलीप गायकवाड, चापोहेकॉ दिपक अंभोरे व धम्मपाल सुरडकर यांच्यासह कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

पहाटे २ वाजता लावला सापळा

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्यात आली. आरोपी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असून तो सेलू (जि. परभणी) येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटे सुमारे 2 वाजता सापळा रचून संशयित आरोपी यश शिवलिंग वीर यास ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news