Sambhajinagar News : मनपाकडून सिटी बसच्या अनावश्यक खर्चाला कात्री

महिन्याभरात ३० लाखांची बचत, ९ बसचे इंजिन यांत्रिक विभागातच दुरुस्त
Sambhajinagar News
Sambhajinagar News : मनपाकडून सिटी बसच्या अनावश्यक खर्चाला कात्रीfile photo
Published on
Updated on

Municipal Corporation cuts unnecessary expenses of city buses

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट सिटी डेव्हलपमेट कापेरिशेनकडून महापालिकेकडे सिटी बस सेवा हस्तांतरित होताच प्रशासनाने तोटा कमी करण्यावर भर दिला आहे. त्यात महिनाभरातच महापालिकेच्या यांत्रिक विभागाने अनावश्यक खर्चाला लगाम लावून बसच्या देखभालीसह इंजिनच्या दुरुस्तीवरील प्रतिबस ५ लाखांचा खर्च २ लाखांवर आणला. यात नादुरुस्त १६ पैकी ९ बसचे इंजिन दुरुस्त करून सुमारे ३० लाखांची बचत केली आहे.

Sambhajinagar News
Property Tax : शहरात १.३३ लाख मालमत्तांना केवळ १२०० रुपयांपर्यंतच कर

शहरावासीयांसाठी केंद्राच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने २०१९ सालापासून स्मार्ट सिटी बससेवा सुरू केली. यात १०० डिझेल बसची खरेदी करण्यात आली होती. मागील सहा वर्षांमध्ये या बसला मागणी वाढली आहे. सध्या शहरातील ३८ मार्गावर बससेवा सुरू आहे. अजूनही विविध मार्गावर बससेवेची मागणी होत आहे. परंतु सहा वर्षांमध्ये १०० पैकी २२ हून अधिक सिटी बसचे इंजिन निकामी झाले आहेत.

त्यामुळे या बस डेपोतच बंद पडून आहेत. यातील सहा बस आठ महिन्यांपूर्वीच स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने दुरुस्त केल्या होत्या. त्यावर प्रतिबस सुमारे ५ लाखांचा खर्च झाला होता. दरम्यान केंद्राने स्मार्टसिटी - प्रकल्पाला मुदतवाढ न देता बरखास्त केले. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून सर्व प्रकल्प महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहे.

Sambhajinagar News
Employee pension : महानगरपालिकेतील २५० सेवानिवृत्तांचे थकले ८० कोटी

यातील स्मार्टसिटी बस सेवा ही महापालिकेच्या यांत्रिक विभागाकडे वर्ग केली आहे. हा विभाग येताच कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी आयुक्तांच्या आदेशाने बस सेवेतील अनावश्यक खर्चाला लगाम लावून तोटा कमी करण्यावर भर दिला आहे. यात सर्वप्रथम देखभाल दुरुस्तीवरील खर्च तपासण्यात आला.

तसेच इंजिन निकामी झाल्याने बंद पडलेल्या बसची स्थिती तपासण्यात आली. त्यात १६ बस इंजिन खराब झाल्याने बंद असल्याचे आढळले. बसच्या इंजिनची दुरुस्ती बाहेर केल्यास त्यासाठी प्रत्येकी ५ लाखांचा खर्च अपेक्षित होता, परंतु यांत्रिक विभागातच हे काम बाहेर करण्यात आले. त्यामुळे प्रत्येकी १.३० ते २ लाखांचाच खर्च आला. ९ बसच्या दुरुस्तीत तब्बल २७ ते ३० लाखांची बचत झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी दिली.

डिझेलमध्ये ६ लाखांची बचत

सिटी बसला दरमहा १ कोटी ५० लाखांहून अधिक रुपयांचे डिझेल लागते. या खर्चात बचत कशी करता येईल, याचा विचार प्रशासनाने केला. त्यात प्रशासनाने कंन्जूमर दर आणि रिटेल दर यासंदर्भात पेट्रोलियम कंपनीशी वाटाघाटी केली. त्यानंतर प्रतिलिटर ३.५० रुपये कमी दराने डिझेल देण्यावर कंपनीने सहमती दर्शविली. त्यानुसार दरमहा ६ ते ७ लाख रुपयांची बचत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news