जिल्हा ग्राहक संरक्षण बैठकीत तक्रारींचा पाढा

जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाई करण्याचे दिले आश्वासन
jalna news
जिल्हा ग्राहक संरक्षण बैठकीत तक्रारींचा पाढाfile photo
Published on
Updated on

A list of complaints was presented at the district consumer protection meeting

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी विविध तक्रारींचा पाढा वाचत त्या सोडविण्याची मागणी केली. जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

jalna news
स्व. अजित पवारांना सर्वपक्षीय नेत्यांची श्रद्धांजली

यावेळी बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव मनीषा देशपांडे, पोलिस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, कृषी उपसंचालक एस.एच. कार्यदे, अन्न व औषध सहा. आयुक्त निखील कुलकर्णी, वैधमापनचे आर.डी. दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अनिल कदम, महावितरणचे चेतन पाटील, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डी. एस. दिवटे यांच्यासह अशासकीय सदस्यांची बैठकीस उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, नागरिकांना दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या अडचणी किंवा समस्यांबाबत उपाय योजना करण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हकांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच ग्राहकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्याचे आहे. याकरिता जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्रामीण भागात विविध माध्यमातून ग्राहक जनजागृतीसाठी विशेष मोहिमेद्वारे प्रयत्न करावा. ग्राहकांना काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करून दिलेले असून, नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर कराव्यात, यावेळी अशासकीय सदस्यांनी बैठकीमध्ये विविध विषयाच्या तक्रारी मांडल्या.

jalna news
पांजरपोळ गौशाळेला शुद्ध देशी गौवंश संवर्धन पुरस्कार

यामध्ये जिल्ह्यातील काही भागांतील औषधी दुकानदार हे काही निवडक डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्श्न असेल तरच औषधी देतात. तसेच शहर व ग्रामीण भागत अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक (बोगस डॉक्टर) असल्याची तक्रारी आहेत. याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील औषध दुकाने आणि बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कार्यवाही करावी, तसेच अन्न औषध प्रशासनाने भेसळयुक्त खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी. ग्रामीण भागातील आठवडे बाजारात विक्रेते दगडाचे माप वापरतात, अशा विक्रेत्यांची तपासणी करून वैधमापन विभागाने कारवाई करावी. परतूर येथील रेशन दुकानामधून मानकांप्रमाणे धान्य वितरित होत नसल्याने अशा दुकानांची तपासणी करावी.

जिल्ह्यातील रस्त्यांवरील दुभाजक अनधिकृतपणे तोडण्यात आलेले आहेत. त्याचा शोध घेऊन योग्य कार्यवाही करावी. शहरातील विविध रस्त्यांवरील सिग्नलच्या वेळा रस्यांतरवर होणाऱ्या वाहनांची वाहतुकीचे अभ्यास करून योग्य कार्यवाही करावी. रस्यांवरील दुभाजकांवर विविध प्रकारचे फलक लावल्याने अपघात होण्याची शक्यता असते, अशा फलकांबाबतीत कार्यवाही करावी. जालना येथील न्यू मार्केट यार्ड समोरील रस्त्यावर गतिरोधकाची आवश्यकता आहे का ? याची पाहणी करून परिवहन कार्यालयाने आवश्य ती कार्यवाही करावी. तसेच वेळोवेळी टॅक्स भरून ही जालना मार्केट कमिटी परिसरातील स्वच्छता होत नाही.

मार्केट यार्ड महावितरणने स्मार्ट मीटर संबंधी प्राप्त तक्रारीचे निवारण करावे. बदनापूर वाहन थांब्याजवळ विद्युत पोल लावले ते तपासून घेणे. तसेच ग्राहकांनी महावितरण संबंधी तक्रारी १९१२ आणि १८००२१२३४३५ यावर नोंदवावी. तसेच आजच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या तक्रारीची दखल घेऊन, याबाबत योग्य करवाई करून, अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.

बैठकीच्या सुरुवातीस प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव मनीषा देशपांडे यांनी प्रास्ताविकात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे उद्दिष्ट सांगून मागील बैठकीबाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच जिल्ह्याच्या ऑनाईलन पोर्टलवर मागील महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगून, तक्रारी ऑनलाइन नोंदवाव्यात. तसेच संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news