Jalna News : रागाच्याभरात जाळली स्वतःचीच दुचाकी

मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने दुचाकी अचानकपणे पेटवून दिल्याने मोठा गोंधळ उडाला.
Jalna News
Jalna News : रागाच्याभरात जाळली स्वतःचीच दुचाकीFile Photo
Published on
Updated on

A drunk youth suddenly set fire to the bike

भोकरदन : पुढारी वृत्तसेवा : भोकरदन येथील बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर एका मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने शनिवार १२ जुलै रोजी सकाळी दहा वाजता त्याची टीव्हीएस कंपनीची स्टार सिटी ही दुचाकी अचानकपणे पेटवून दिल्याने मोठा गोंधळ उडाला.

Jalna News
Jalna News : जालन्यात ५१ फूट भारत माता मंदिर साकारणार

या घटनेनंतर पोलिसांनी जळालेल्या अवस्थेतील दुचाकी चा सांगाडा जप्त केला असून संबंधित तरुणाच्या विरुद्ध पोलीस ठाणे भोकरदन येथे गुन्हा दाखल केला आहे. भोकरदन शहरात शनिवारी आठवडी बाजार असल्याने बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी स्मारका समोरील रस्त्यावर सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठी वर्दळ सुरू असताना तालुक्यातील फत्तेपूर येथील रामेश्वर सजनराव वनारसे हा तरुण मद्यधुंद अवस्थेत टीव्हीएस स्टार सिटी या दुचाकी वर बसून बाजार करण्यासाठी आला.

Jalna News
Jalna News : चालक-वाहकांच्या भरतीअभावी जालन्यात थांबला ई-बसचा प्रवास

यादरम्यान स्मारकाजवळ त्याचा अन्य दुचाकीस्वाराशी किरकोळ वाद झाला. त्यानंतर त्याने लगेच दुचाकीवरुन खाली उतरून दुचाकी पेटवून दिल्याने काही काळ गोंधळ उडाला. यावेळी पोलीस बीट जमादार उबाळे, कर्मचारी पिंपरकर, गवळी यांनी दुचाकी पेटवून आरडाओरड करणाऱ्या रामेश्वर सजन वनारसे या युवकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news