Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांची अवस्था पाहून महिलांना अश्रू अनावर; पाणी पिण्याची विनंती | पुढारी

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांची अवस्था पाहून महिलांना अश्रू अनावर; पाणी पिण्याची विनंती

वडीगोद्री : पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. उपोषणादरम्यान जरांगे पाणी आणि औषधोपचार घेत नसल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. दरम्यान जरांगे यांची अवस्था पाहून महिलांना अश्रू अनावर झाले असून पाणी पिण्याची विनंती केली आहे. मात्र, त्यांनी साफ नकार दिला आहे.

संबंधित बातम्या 

मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आज सोमवारी (दि. १२) रोजी त्यांच्या बिड जिल्ह्यातील मूळ गाव असलेल्या मातोरी गावातील महिला आल्या होत्या. जरांगे यांची खालावलेली तब्बेत पाहून या महिलांना अश्रू अनावर झाले. या महिलांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली. ( Manoj Jarange Patil )

या महिलांच्या सततच्या विनंतीमुळे संतापलेल्या जरांगे- पाटलांनी पाणी तर घेतलं नाहीच मात्र, महिलांना व्यासपीठाजवळ का येऊ दिलं? असा जाब त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना विचारला. दरम्यान जरांगे यांना काही झाल्यास सरकारच जबाबदार राहील? असे मातोरी गावच्या महिलांनी म्हटलं आहे.

Back to top button