Manoj Jarange Patil …तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही : मनोज जरांगे-पाटील | पुढारी

Manoj Jarange Patil ...तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही : मनोज जरांगे-पाटील

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : वेगळ्या आरक्षणाची चर्चा करू नये, ओबीसीतून आरक्षण दिले तरच उपोषण मागे घेऊ, अन्यथा मी उपोषण मागे घेणार नाही. १५ तारखेच्या अधिवेशनात सरकारने सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही आणि हैद्राबाद गॅझेट स्वीकारले नाही, तर महाराष्ट्रात काय होईल हे सरकारला माहीत आहे, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.
आज (दि.१२) ते आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. Manoj Jarange Patil

सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जरांगे- पाटील अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. Manoj Jarange Patil

गुरूवारी (दि.१५) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना भेटायला शिष्टमंडळ पाठवणार का? या प्रश्नावर ते म्हणाले की, अमित शहा यांच्याशी आमचे देणे-घेणे नाही. अमित शहांना गरज वाटली, तर ते अंतरवालीत येतील. आमचं कुणीही त्यांना भेटायला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

४-५ लोकांच्या हट्टासाठी सरकारने मराठ्यांच्या पोरांच्या जीवाशी खेळू नये, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला. बुधवारी (दि.१४) महाराष्ट्र बंदबाबत मला माहिती नाही, तो समाजाचा निर्णय असेल, तर समाजापेक्षा कुणीही मोठा नाही, फक्त शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले.

हेही वाचा 

Back to top button