Carry Bags Seized : जालन्यात ५ क्विंटल प्रतिबंधित कॅरिबॅग जप्त

दोने आस्थापना मालकांना १० हजारांचा दंड; भरारी पथकाची मोठी कारवाई
jalna news
जालन्यात ५ क्विंटल प्रतिबंधित कॅरिबॅग जप्तfile photo
Published on
Updated on

5 quintals of banned carry bags seized in Jalna

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरात प्रतिबंधित प्लास्टिक कॅरिबॅगचे उत्पादन व साठा करणाऱ्यांवर जालना महानगरपालिकेने मोठी धडक कारवाई करत तब्बल ४ ते ५ क्विंटल प्रतिबंधित कॅरिबॅग जप्त केल्या. या कारवाईदरम्यान दोन मालकांवर प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे एकूण १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

jalna news
Sambhajinagar News : प्लास्टिक वापरणाऱ्यांवर मनपाची दंडात्मक कारवाई

दरम्यान, जालना शहर महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी एकल प्लास्टिक विक्री करणाऱ्याविरोधात मोहीम उघडली आहे. शहरातील बेकायदेशीर प्लास्टिक उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

महानगरपालिका प्रशासनाला शहरात छुप्या पद्धतीने प्रतिबंधित प्लास्टिक कॅरिबॅगची निर्मिती व साठा केला जात असल्याची माहिती मिळाली होती. या पथकाने संशयित ठिकाणांवर छापे टाकत कारवाई केली.

jalna news
jalna News : शहरातील ४० अतिक्रमणे हटवली

या कारवाईत स्वच्छता विभाग प्रमुख सुधीर डहाळे, कार्यालय अधीक्षक आनंद अंभोरे, स्वच्छता निरीक्षक शुभम डहाळे, स्वच्छता निरीक्षक अजमत खान यांच्यासह मनपाचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक सहभागी झाले होते. अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष गोदामांची झडती घेत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित कॅरिबॅगचा साठा जप्त केला. जप्त केलेला माल महानगरपालिकेच्या वाहनातून मनपा गोदामात जमा करण्यात आला.

तर फौजदारी गुन्हा

तसेच प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित दोन मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. येत्या काळात संबंधितावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही आयुक्ता अंजली शर्मा यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news