Agriculture News : बियाणे-खतांच्या किमतीत 30 टक्के वाढ

पेरणीच्या तोंडावर शेतकरी सापडला आर्थिक संकटात; त्या तुलनेत शेतीमालाला भाव मिळेना
Agriculture News
बियाणे-खतांच्या किमतीत 30 टक्के वाढ pudhari photo
Published on
Updated on

टेंभुर्णी ः सध्या बियाणे व खतांच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी 1100 रुपयांना मिळणारी खतांची गोणी आता थेट 2000 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. हंगामाच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे शेती करणे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असून, सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बियाणे-खतांच्या किमतीत तीस टक्के वाढ झाली आहे.

ऐन खरीप हंगामात, शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असतानाच बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ भाववाढ करून जगाच्या पोशिंद्यावर थेट आर्थिक बॉम्ब टाकण्यात आला आहे. जाफराबाद तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात गेलेल्या शेतकऱ्याला गेल्यावर्षीपेक्षा 30 ते 40 टक्के जास्त दर ऐकून घाम फुटला. बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

Agriculture News
Jalna chia farming : जालन्याच्या काळ्या मातीत उगवलं परदेशी सोनं !

बाजारात खताचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे. खताची गोणी 1350 वरून थेट 1900 पोहचली आहे. युरिया, पोटॅश, सुपर फॉस्फेट प्रत्येक गोणीमागे 400 ते 600 रुपयांची दरोडेखोरी झाली आहे. बियाण्याचा भाव गगनाला भिडले आहे. यात सोयाबीनचे एका बॅगचे पाकीट 4500 वरून 6000 पार. कापसाचे बियाणे 800 वरून 1200 चे नावाखाली लूटमार सुरू आहे.

Agriculture News
Fertilizer Price Hike: खतांच्या दरवाढीने बळीराजा संकटात; शेतीचे आर्थिक गणित बिघडले

शेतकऱ्याच्या घरातून कापूस, सोयाबीन, तूर, मका निघाला की व्यापारी मातीमोल भावाने घेतो. तोच माल व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये जाताच दुसऱ्या दिवशी भाव कडाडतो. ही थेट शेतकऱ्याची थट्टा नाही तर काय? त्या तुलनेत शेतमाला भाव शासना का देत असा सवाल शेतकरी उपस्थितीत करत आहे.

यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील मशागत करून पेरणीसाठी लगबग सुरू असताना कृषी सेवा दुकानात बियाणे रसायनिक खतांच्या किंमती ऐकून धक्का बसला. सरकारने आमच्या ही मालाला योग्य भाव जाहीर करावा.

गोरखनाथ राऊत, शेतकरी

केंद्र सरकारने व राज्य सरकारने कापूस, मका, सोयाबीन आदींच्या पिकांची हमीभाव जाहीर करून आदेशीत करावे जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार यावर्षी सगळ्या च गोष्टींचा भरमसाठ महागाई वाढली. शेत नांगरणी मशागत मंजुरीसाठी मंजूर मिळेणा त्यांचे ही मंजुरी वाढ झाली. यासर्व गोष्टींचा सरकारने विचार करून योग्य भाव हमी भाव जाहीर करावा.

नसीम शेख, शेतकरी मित्र

सर्व कृषी सेवा दुकानदाराने याबाबत सरकारकडे भाववाढ बाबतीत तक्रार केली. परंतु जे ठरवून दिलेले आहेत यापेक्षा जास्त भाववाढ विक्री करू नये म्हणून आम्ही सर्वांना सूचना दिल्या.

धीरजकुमार काबरा, अध्यक्ष कृषी सेवा असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news