Jalna News : गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी १८ पथके

एलपीजी पुरवठ्यावर प्रशासनाची करडी नजर
jalna news
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी १८ पथकेfile photo
Published on
Updated on

18 teams to prevent black marketing of gas

जालना, पुढारी वृत्तसेवा इस्रायल अमेरिका आणि इराण या देशांच्या युध्दजन्य परिस्थितीचा वाईट परिणाम जालना जिल्ह्यालाही भोगावा लागत आहे. सध्या घरगुती गॅसची वेटिंग पाच दिवसांवर आली असून, जालना जिल्ह्यात एलपीजी गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जालना शहरातील ४ सह तालुकास्तरावर एकूण १८ पथके तैनात करण्यात आली आहे.

jalna news
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

घरगुती गॅसचा अवैध वापर व साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभागाने निर्णय घेतला आहे. दरम्यान, पश्चिम आशिया प्रदे शात निर्माण झालेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जालना जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत.

jalna news
Domestic gas : तीन दिवस पुरेल एवढाच घरगुती गॅसचा साठा

जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा विभागाच्या आदे शानुसार जिल्ह्यात तालुकास्तरावर १८ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. या पथकांमार्फत गॅसचा अवैध वापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सूचनांनुसार जिल्हास्तरावर नियंत्रण व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. अमेरिका इस्रायल आणि इराण या देशात मध्य आशित युध्द सुरू आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या उपलब्धतेवर परिणाम होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news