गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

तपासणी पथके स्थापन करण्याचे निर्देश, गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा
black marketing of gas cylinder
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कडक कारवाईfile photo
Published on
Updated on

District administration takes strict action to prevent black marketing of gas

जालना, पुढारी वृत्तसेवा: घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना घरगुती गॅसच्या वितरणावर लक्ष ठेवून नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

black marketing of gas cylinder
Online Game : ऑनलाइन गेम्समुळे वाढतो मानसिक तणाव ; आर्थिक फसवणुकीचीही शक्यता !

शासनाच्या निर्देशानुसार घरगुती एलपीजी गॅसच्या वापराबाबत केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयासह पीपीएसी, पीएनजीआरवी आणि पीईएसओ यांसारख्या संस्थांनी ठरवून दिलेले नियम व मार्गदर्शक तत्त्वे लागू आहेत. मात्र सध्याच्या जागतिक युध्दजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा अवैध वापर आणि काळाबाजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा त्याचा गैरवापर थांबवावा यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी गॅस एजन्सींची नियमित तपासणी करण्यात येणार आहे.

black marketing of gas cylinder
जालना-देऊळगाव राजा मार्गावर भीषण अपघात; बापलेक ठार

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी तसेच गॅसचा अवैध वापरावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. हॉटेल व्यावसायिकांचे निवेदन सद्यस्थितीत गॅस साठा उपलब्ध नसून पुढील साठ्याबाबत शाश्वती नसल्याचे सांगून पुरवठादार हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे गंभीर संकट आहे. जिल्हा प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांचा गॅस पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

दक्षता घेण्याचे निर्देश

पुरवठा विभागाच्यावतीने तालुकास्तरावर विशेष तपासणी पथके स्थापन करून, विविध ठिकाणी अचानक तपासण्या करण्यात येणार आहेत. या कारवाईबाबतचा अनुपालन अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये, याची दक्षता घेण्याचेही निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news