जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील ११० महिलांचा सन्मान

महिला सक्षमीकरणासाठी संस्थेचे सातत्याने प्रयत्न : विनायक चोथे
jalna news
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील ११० महिलांचा सन्मानfile photo
Published on
Updated on

110 women from various fields honored on International Women's Day

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :

घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त 'स्त्री शक्तीचा सन्मान' हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अंबड व घनसावंगी तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय तसेच उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११० महिलांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

jalna news
गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी स्वामी रामानंद शिक्षण संस्थेचे सचिव विनायक चोथे म्हणाले, की संस्था विद्यार्थी शिक्षणाबरोबरच सामाजिक सक्षमीकरणासाठीही सातत्याने कार्यरत आहे. समाजात आजही महिलांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. बालविवाह, विधवा विवाह, हुंडा प्रथा घनसावंगी : जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यांसारख्या सामाजिक समस्यांवर मात करून महिलांना सक्षम बनवण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत, असे त्यांनी नमूद केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र परदेशी होते.

jalna news
जालना-देऊळगाव राजा मार्गावर भीषण अपघात; बापलेक ठार

यावेळी व्यासपीठावर सिनेकलाकार अश्विनी भालेकर, उद्योजिका अंकिता मोरे, रा कॉ जिल्हा महिला आघाडीच्या श्रीमती मंगला पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिशा राऊत, डॉ. जायदा शेख, डॉ. जयश्री पवार, सरपंच श्रीमती सरस्वती पवार, नगरसेविका श्रीमती उज्ज्वला साळवे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत, एजाज शेख, उपप्राचार्य डॉ. गजानन अवचार, अविनाश वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी एजाज शेख, डॉ. दिशा राऊत, डॉ. जयश्री पवार, मंगलाताई पाटील, मुक्ता गायकवाड, अंकिता मोरे, अश्विनी भालेकर, एकनाथ राऊत, योगिता दौड, डॉ. जोत्स्ना धांडगे, गंगा आर्दड, गीता वाघुंडे, आयोध्या मरकड, डॉ. जया बागुल, अनिता आर्दड, सुनीता जुंबडे, सुनीता चव्हाण, शोभा तौर, ज्योती लोळगे, दुर्गा नाडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती पुष्पा कापसे यांनी उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधक शपथ दिली. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र परदेशी, सूत्रसंचालन डॉ. मारुती घुगे तर आभार प्रदर्शन डॉ. गजानन अवचार यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news