Parbhani Gram Panchayat Election : बारा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

Parbhani Gram Panchayat Election : बारा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : परभणी जिल्ह्यातील जिंतूरमधील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल हाती आले असून बारा ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने वर्चस्व राखले आहे. यात पाचलेगाव, वस्सा, नांदगाव (दु), कवठा-बदनापूर, मांडवा, वझर (बु), नवहाती तांडा, वडाळी, वडी, बामणी, असोला यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर मालेगाव (दु) या ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीचा एकत्रित उमेदवार निवडून आले आहेत.

निवडून आलेल्या सर्व उमेदवरांचे मा. आ. विजयराव भांबळे यांनी हार व पक्षाचा रुमाल घालून सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी जि. प. सदस्य रामराव उबाळे, विश्वनाथ राठोड, बाळासाहेब घुगे, अभिनय राऊत, मुरलीधर मते, गणेशराव इलग, मधुकर भवाळे, विजय खिस्ते, शरदराव मस्के, किरण दाभाडे, माजी नगरसेवक बाळासाहेब भांबळे, मनोहर डोईफोडे, शाहेदबेग मिर्झा, उस्मान पठाण, शोएब जानिमिया, दत्तराव काळे, मनोज थिटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news